---Advertisement---
भुसावळ : शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘दामिनी पथका’च्या माध्यमातून कडक कारवाई सुरू केली आहे. आहे. शुक्रवारी शहरातील एका विद्यालयाच्या आवारात तीन टवाळखोरांना पकडून त्यांना सार्वजनिकरित्या कान धरूनउठाबशा काढायला लावण्यात आल्या.
शहरात शैक्षणिक संस्थांच्या आसपास छेडछाड, दुचाकीवरून घिरट्या मारणे, अश्लील शेरेबाजी, मोबाईलवर गाणी वाजवणे अशा प्रकारांचा त्रास विद्यार्थिनींना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्याने डीवायएसपी पिंगळे यांनी दामिनी पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
---Advertisement---
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारती पाटील, महिला कर्मचारी सीमा चिखलकर आणि हेमंत जांगडे
यांनी शुक्रवारी गस्त घालत असताना शहरातील एका विद्यालयात घुसून त्रास देणाऱ्या तीन युवकांना पकडले. त्यांना तिथेच शिक्षा देत कान धरून उठाबशा काढायला लावण्यात आले. त्याच दिवशी पथकाने डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण केली.
पोलिसांचा इशारा
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.