---Advertisement---

भविकांनो खुशखबर ! नाशिक कुंभमेळ्यातील शाही व पर्व स्नानाचा तारखा जाहीर

by team

---Advertisement---

नाशिक : येथे 2026 मध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. यानुसार पुढील वर्षी 31 ऑक्टोबर रोजी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होईल. हा सोहळा 18 महिन्यांऐवजी 22 महिन्यांचा असणार आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथे 31 ऑक्टोबर ते जुलै येथे होईल.


रविवारी (1 जून ) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळ्याच्या शाही स्नान तसेच पर्व स्नानाच्या तरखांची अधिकृत घोषणा करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह साधू महंत देखील उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळाच्या नियोजन संदर्भात 13 आखड्याचे महंत यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली.

नाशकात भरणारा हा भव्य कुंभमेळावा दीर्घकालीन तसेच नियोजित स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळा पर्वाला 31 ऑक्टोबर 2026 पासून प्रारंभ होवून 24 जुलै 2028 ला याची सांगता होणार आहे. या कुंभमेळाव्यात 42 पर्वस्नान असणार आहे.

कुंभमेळाव्याच्या संभाव्य तारखा अशा…

31 ऑक्टोबर 2026 – रामकुंडावर ध्वजारोहणानंतर कुंभमेळा पर्वाला प्रारंभ
24 जुलै 2027 आषाढ कृष्ण पंचमी – आखाडाचे ध्वजारोहण
29 जुलै 2027 एकादशी- नगर प्रदक्षिणा

अमृतस्नानाच्या तारखा अशा

2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावस्या – पहिले अमृत स्नान
31 ऑगस्ट 2027 श्रावण वहा अमावस्या महाकुंभस्नान होईल.
11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीचे अमृत स्नान
मुख्य पर्वकाळ असणाऱ्या 31 ऑगस्ट 2027 च्या दिवशी सूर्य चंद्र गुरू सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान होईल.

यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे, यात गुरू हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो.
यंदाचा कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरुचे भ्रमण इतर राशीमध्ये होणार आहे. कोणत्या दिवशी गुरु कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती.

31 ऑक्टोबर 2026 गुरू सिंह राशीत प्रवेश
24 जानेवारी 2027 वक्री होऊन गुरू कर्क राशीत प्रवेश
25 जून 2027 गुरू सिंह राशीत प्रवेश 25
26 नोव्हेंबर 2027 गुरु कन्या राशीत प्रवेश
28 फेब्रुवारी 2028 गुरू सिंह राशीत प्रवेश
24 जुलै 2028 गुरु कन्या राशीत प्रवेश करत आहे.


कुंभमेळाचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला असल्याने सिंहस्थ कुंभमेळाच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याच्या शाही पर्वणी सुरु होऊन 24 जुलै 2028 रोजी सांगता होणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment