तरुण भारत लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । सचिन अनंतराव नालटे (वय ३२ वर्ष, रा. रवळगाव) हा तरुण देवदर्शनासाठी जात असताना सेलू-परभणी रस्त्यावर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नालटे हा यशवाडी येथे दर्शनासाठी जात होता. अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागल्याने सचिनचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चौरे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर जानगर, पोलिस शिपाई मनोहर कोपनार, जगन्नाथ मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. रवि चौरे यांनी शवविच्छेदन केले. सचिन नालटे याच्या अपघाती मृत्यूमुळे रवळगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.