---Advertisement---

Dhule Accident News : दुर्दैवी ! पेनाचे टोपण गिळल्याने चिमुकलीचा मृत्यू

by team
---Advertisement---

धुळे :  तालुक्यातील  निमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत एका शोकात्म घटनेने ह्रदय हेलावून सोडले. इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी अर्चना युवराज खैरनार या चिमुकलीचा पेनाचे टोपण गिळल्यामुळे मृत्यू झाला आहे.

धुळे येथील जिल्हा परिषद शाळा, निमखेडी येथे इयत्ता पहिलीत शिकणारी अर्चना खैरनार या चिमुकलीने पेनाचे टोपण गिळले.  अर्चना ही गुरुवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी अभ्यास करत असताना तिने पेनाचं टोपण तोंडात धरलं, जे अचानक तिच्या घशात अडकलं. त्यामुळे तिच्या श्वासोच्छ्वासात अडचणी आल्या आणि ती घाबरून गेलेली होती. शिक्षकांनी तातडीने पाठीवर थपथपी करून टोपण काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल कारणात आले. टोपण गिळल्यानंतर तिच्या आजीलाही बोलावून घेण्यात आलं होते. परंतु, दुर्देवाने तोपर्यंत रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अर्चनाचे वडील हे उसतोड कामगार आहेत. अर्चना तिच्या आजोबांकडे शिकण्यासाठी निमखेडी येथे आली होती. तिच्या आई संगीता यांचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता आणि तिच्या पाठीमागे तीन लहान बहिणी आहेत. तिच्या कुटुंबाने आणि मामा जितेंद्र निकम, आजी कल्पना निकम, आणि आजोबा चुडामन निकम यांनी तिचा सांभाळ केला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment