---Advertisement---

जळगावात अनोळखी इसमाचा मृत्यू, जिल्हापेठ पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन

---Advertisement---

जळगाव : शहरातील रुबी हॉस्पिटलजवळ एका अंदाजे ३० वर्षीय अनोळखी इसमाला २३ फेब्रुवारी रोजी रात्री १.४५ वाजता १०८ रुग्णवाहिकेद्वारे सिव्हील हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वॉर्ड क्रमांक १३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान जिल्हापेठ पोलिसांसमोर असून, पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोळे यांनी दिलेल्या अहवालानुसार, शहरातील रुबी हॉस्पिटलजवळ एका अंदाजे ३० वर्षीय अनोळखी इसमाला २३ फेब्रुवारी रोजी रात्री १.४५ वाजता १०८ रुग्णवाहिकेद्वारे सिव्हील हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वॉर्ड क्रमांक १३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान जिल्हापेठ पोलिसांसमोर असून, पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

घटना स्थळ : रुबी हॉस्पिटलजवळ, जळगाव
उपचारासाठी दाखल वेळ : २३ फेब्रुवारी, रात्री १.४५ वाजता
उपचार सुरू असताना मृत्यू : २३ फेब्रुवारी, संध्याकाळी ४.०० वाजता
खबर देणारे : सिव्हील हॉस्पिटलच्या सीएमओ डॉ. माधुरी सोसे
पोलिस स्टेशन: जिल्हापेठ, जळगाव
अनामिक इसमाची माहिती: अंदाजे ३० वर्षांचे पुरुष, नाव व पत्ता अज्ञात

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

जिल्हापेठ पोलिसांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केली आहे की, संबंधित अनोळखी इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास तातडीने (जिल्हापेठ पोलीस स्टेशन: 0257-2229733/ HC विनोद भोळे: 7798469841 ) पोलिसांशी संपर्क साधावा.

कोणत्याही हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात असलेल्या कुटुंबीयांनी सिव्हील हॉस्पिटल किंवा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment