---Advertisement---

शहादा न्यायालयाच्या नवीन इमारतीची मागणी, आ. राजेश पाडवींसह वकील संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by team
---Advertisement---

शहादा : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या जागेत नवीन इमारत बांधकामास निधी मिळावा व इमारत बांधकाम काळात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची आसन व्यवस्था अन्य ठिकाणी करण्याबाबत आ. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत नंदुरबार जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश कुलकर्णी व वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. अमोल गुलाले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा केली. यासाठी निधी मंजूर करुन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून आ.राजेश पाडवी व अधिवक्ता परिषद देवगिरी नंदूरबार जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश कुलकर्णी व वकील संघाच्या प्रयत्नाला यश आले आहे.

शहादा येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत जुनी असल्याने दर पावसाळ्यात पावसाचे पाणी न्यायालयाचे आवारात शिरूर न्यायालयीन कामकाजावर परिणाम होतो. पक्षकारांनाही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणून आ. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. राजेश कुलकर्णी व वकील
संघाचे उपाध्यक्ष ॲड. अमोल गुलाले यांची अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी भेट घेऊन न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी व इमारत बांधकामाचे कळत न्यायालयाचे आसन व्यबस्था इतर ठिकाणी करून देण्यासंदर्भात त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून द्यावी म्हणून चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सकारात्मक पवित्रा घेऊन सदर निवेदन न्याय निधी मंत्रालयाकडे पाठवून यावर ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे जुन्या जागेत नवीन इमारत बांधण्यासंदर्भात लवकरच निधी उपलब्ध होणार असून लवकरच इमारतीचे काम सुरुवात होणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment