Bhusawal News : तहसील कार्यालयातील लाच प्रकरणात तहसीलदारांनाही आरोपी करण्याची मागणी

---Advertisement---

 

भुसावळ : येथील तहसीलदार निता लबडे यांना महसूल लाचप्रकरणी आरोपी करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांना तक्रार अर्ज ई-मेलद्वारे पाठवून केली आहे.

याबाबत माहिती अशी की, १३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय परिसरातच वराडसीम येथील तलाठी, कोतवाल व एका व्यक्तीसह लाचलुचपत विभागाने छापा टाकून तिघांना अटक केली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
त्यामध्ये फिर्यादीने तक्रार अर्जामध्ये तहसीलदार व इतरांनी लाच घेतल्याबाबत नमूद केले आहे. मात्र संशयित आरोपी तलाठी नितीन पंडितराव केले व कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव तसेच खासगी पंटर शिवदास लटकन कोळी यांना अटक झाली होती. त्या चौकशी दरम्यान तहसीलदार नीता लबडे व मंडळ अधिकारी यांची चौकशी सुरू आहे.

यासंदर्भात सदरील चौकशी निपक्ष व्हावी व तहसीलदार नीता लबडे यांना या प्रकरणी आरोपी करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज ई-मेलद्वारे पाठविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---