‘त्या ‘अध्यादेशाची सहमती नाकारा ; मुख्यमंत्र्यांना आदिवासी टोकरे कोळी जमाती बांधवांचे साकडे

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवार ,  १३  रोजी जळगावात एका कार्यक्रमासाठी आले होते . यावेळी आदिवासी टोकरे कोळी जमातीचे बांधव यांनी घेतली भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या भेटी दरम्यान महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणी विनियमन ) २००० मध्ये सुधारणा करणे बाबतच्या अध्यादेशाला सहमती नाकारणे बाबत निवेदनात टोकरे कोळी जमातीची बांधवांनी मागणी केली आहे.

वैधता प्रमाणपत्र पुनर्विलोकन करणे, अपिलीय प्राधिकरण गठीत करणे, दंडाच्या रकमेत वाढ करणे तसेच एफ आय आर ची तरदूत करणे, समितीच्या सदस्यांना संरक्षण देने इ. सुधारणा वरील अधिनियमात करण्याचे मंत्रिमंडळात मान्यता ७  ऑगस्ट २०२४ च्या बैठकीत दिलेली आहे तरी ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी  प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, भगवान सोनवणे, पंकज सपकाळे, अमित सोनवणे, गुलाब बाविस्कर, साहेबराव सैनदाने, जितेंद्र सपकाळे, दीपक तायडे आदी उपस्थित होते .