---Advertisement---
धरणगाव : देशात वर्षानुवर्ष इंग्रजानी तोडा व फोडा आणि राज्य करा अशी सामाजिक दरी निर्माण करून हिंदु समाजात जातीय तेढ निर्माण केली. आपसातील भांडणे लाऊन आपली सत्ताकेंद्र त्यानी मजबुत केली म्हणुन पोखरलेल्या हिंदु समाजाला जागे करण्यासाठी प.पु.डाॅ हेडगेवारानी 1925 मध्ये रा.स्व.संघाची स्थापना करून गुणवत्ता पुर्वक राष्ट्रीय समाज उभा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन जळगाव येथील विभाग प्रचारक विकास राजेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रबोधनात श्री देशपांडे यांनी संघ स्थापनेपासून तर आजतागायत केलेल्या सामाजीक कार्याचा आढावा सादर केला. ते म्हणाले की, आजचा समाज व्यवस्थेत संघाने आपली कार्यपध्दतीवर काम करतांना समाजातील सर्व घटक व जाती व पाती भेदभाव दुर करून आदर्श समाज निर्माण करण्यात रा.स्व.संघाचे मोठे योगदान असल्याचे नमुद केले. नुकताच येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात रा.स्व.संघाचा विजयादशमीचा शस्त्र पुजनाचा उत्साह प्रसंगीं देशपांडे बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील प्रगतिशील शेतकरी सचिन भारंबे, व अनोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक व तालुका संघचालक मोहन चौधरी उपस्थित होते.
ते म्हणाले की अधर्मावर धर्माचा,असत्यावर सत्याचा विजय संपादनचा दिवस असल्याचे नमुद करुन भगवान श्रीरामाने रावणाचा वध केल्याचा विजय दिवस विजया दशमीची आठवण करून दिली व वर्षानुवर्ष चालत असलेला ह्या संघ कार्याची महंती सादर केली व संघ स्वयंसेवकानी पुढेही हे कार्य जोमाने सुरु ठेवावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविकात व प्रमुख अतिथीचा परीचय तालुका कार्यवाह रविंद्र चौधरी यांनी केला तर आभार नगर कार्यवाह नारायण चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमात क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी हे देखील उपस्थित होते.
---Advertisement---