धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथील वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी यास धुळे लाच लुचपत प्रतिबंध विभागातर्फे रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराकडून त्याने ५०० रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. याची सतत्यता तपासून धोबीला ४०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. यावरून शिरपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज पुरवठ्याची वायर दुसऱ्या खांबावर शिफ्ट करण्याकरीत याचा मोबदला म्हुणुन ५०० रुपयांची लाच मागतील होती. तडजोडीनंतर ती ही रक्कम ४०० रुपये करण्यात आली. हे चारशे रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर येथील वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शिरपुर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घराचे मौजे वरवाडे शिरपुर येथे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी तक्रादारांच्या घराच्या विज पुरवठयाच्या वायरचा अडथळा येत होता . यामुळे ही वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन मिळण्याकरीता तक्रारदार यांनी महावितरणच्या उपविभाग, शिरपुर कार्यालयात जावुन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेतली. यावेळी त्यांना त्यांच्या विज पुरवठयाची वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देणेबाबत विनंती केली. यावेळी धोबी यांनी दुसऱ्या खांब्यावरुन वायर जोडुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपये लाचेची मागणी केली. यानंतरतक्रादाराने भ्रमणध्वनीव्दारे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या धुळे कार्यालयास माहिती दिली होती.
या तक्रारीनुसार, लाचलुचपत धुळे विभागाच्या पथका शिरपुर येथे जावुन तक्रारदार यांची तक्रार नोंदवुन घेत पंचांसमक्ष पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती ४०० रुपये लाचेची मागणी केली. या लाचेची रक्कम जितेंद्र धोबे याने स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुध्द शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.