धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आली आहे. या मुलीस शाळेच्या आवारातून फूस लावून पळविले होते. आरोपी सागर राजेंद्र गवळे (रा.कोठली ता.शहादा जि.नंदुरबार) याने साक्री तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस १० ऑक्टोबर रोजी शाळेतून फूस लावून पळविले होते.
मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी १२ ऑक्टोबर रोजी निजामपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार निजामपुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु, कोणताही पुरावा नसताना तंत्रज्ञानाच्या आधारे पोलीसांनी तपास करत आरोपीस मांडवगण फराटा ता. शिरुड जि.पुणे येथून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यात वाढीव कलम भा.न्या.सं. क.64(1) लैंगिक अपराधापासुन बालकांचे सरंक्षण अधिनियम 2012 चे क.4,8,12 प्रमाणे वाढ करुन गुन्ह्यातील आरोपी सागर राजेंद्र गवळे यास अटक करण्यात आली आहे.
श्रीकांत धिवरे, धुळे येथील पोलीस अधिक्षक किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मयुर एस.भामरे, प्रदीप सोनवणे, यशवंत भामरे, संजय पाटील, नारायण माळचे, आर.यु.मोरे, प्रदीपकुमार आखाडे, पृथ्वीराज शिंदे, सुनिल अहिरे, परमेश्वर चव्हाण, अमोल जाधव स्थानिक गुन्हा शाखा, धुळे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.