---Advertisement---

Dhule News : रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी ! देशस्तरावर ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर, ९ जून ला विशाखापट्टणम येथे वितरण

---Advertisement---

Dhule News : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशस्तरावरील ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तिवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने बुधवारी (२१ मे) या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रम ाणपत्र आणि १० लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. आंध्र प्रदेशातील नोव्होटेल, विशाखापट्टणम येथे ९ जूनला होणाऱ्या २८ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२३-२४ स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ग्राम पंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यातून धुळे जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर रोहिणी (ता. शिरपूर) ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. त्यात राज्यात पहिले स्थान मिळवून रोहिणी ग्रामपंचायतीची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली होती.

स्पर्धेसाठी देशभरातून फक्त सहा ग्रामपंचायती या पुरस्काराच्या स्पर्धेत होत्या. त्यातील महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीस सुवर्ण पुरस्कार, पश्चिम मजलीशपूर (जि. पश्चिम त्रिपुरा, त्रिपुरा) ग्रामपंचायतीस रौप्य पुरस्कार, पलसाणा (जि. सुरत, गुजरात) आणि सुकाटी (जि. केडुझार, केडझार, ओडिशा) या ग्रामपंचायतींना ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.

स्पर्धेत प्रामुख्याने ग्रामपंचायती किंवा समतुल्य पारंपरिक स्थानिक संस्थांद्वारे केलेल्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून सेवा वितरण अधिक सखोल विस्तारित करण्यासाठी ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज या श्रेणीअंतर्गत सुवर्ण, रौप्य आणि ज्युरी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी १० मे रोजी दिल्लीतील सेंट्रल ज्यूरी टीमसमोर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सादरीकरण केले होते.

दरम्यान, रोहिणी ग्रामपंचायतीचा ई-गव्हर्नन्स ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, विस्तार अधिकारी संजय पवार यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समि तीतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे रोहिणीचे सरपंच डॉ. आनंद पावरा, ग्राम सेवक आर. के. कुमावत यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment