Dhule News : ‘स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, मागणीसाठी ईदगावपाडा ग्रामस्थ आक्रमक

धुळे :  स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी साक्री तालुक्यातील ईदगावपाडा येथील ग्रामस्थ करत आहेत. त्‍यामुळे येथील वसाहतीला तातडीने ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली.

लाटीपाडा धरणासाठी १९६९ ते १९७३ या कालावधीत जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले.  या  ग्रामस्थांना स्थलांतरीत  करून ईदगावपाडा गाव नव्याने १९५२ मध्ये स्थापन करण्यात आले. हे गाव  पिंपळनेर जवळ आहे. यामुळे या गावाचे पिंपळनेर ग्रामपंचायतीत समायोजन करण्यात आले. परंतु, नगरविकास विभाग मंत्रालयाच्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले आहे. पिंपळनेर येथे ग्रामपंचायत अंतगर्त आदिवासी ग्रामस्थांना पेसा कायद्यानुसार सोयी-सवलती प्राप्त होत होत्या. मात्र , नगरपरिषद झाल्यापासून पेसा कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी व सुविधा बंद झाल्या आहेत. ईदगावपाडा या गावाला पिंपळनेर नगर परिषदेतून वगळून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा. निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेचे सीईओ, साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पिंपळनेरचे अपर तहसीलदार व पिंपळनेर नगर परिषदेचे प्रशासक यांना देण्यात आली.

यावेळी देवीदास गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, दिनेश पवार,  सागर देशमुख, लक्ष्मण गांगुर्डे,  सुरेश ठाकरे, साहेबराव पवार, किसन ठाकरे, दीपक परदेशी, हेमंत राऊत, मेघराज पवार,  वसंत गवळी आदी उपस्थित होते.