‘लव्ह जिहाद’ घडविणाऱ्यावर भुसावळ शहरात चर्चितचर्वण, पोलीस प्रशासनाचे कायद्याने हात बांधले की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?

---Advertisement---

 

उत्तम काळे

भुसावळ : येथे गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुलींना फसवून त्यांचे एका विशिष्ट समाजाच्या तरुणांसोबत विवाहाचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे ‘लव्ह जिहाद’ रोखण्याचे पोलिसांनाही मोठे आव्हान असून या ‘लव्ह जिहाद’ ची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलीस प्रशासन मात्र यासंदर्भात अनभिज्ञ असून तक्रारच नाही तर, पोलिसांकडून कुणावर गुन्हा दाखल होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी हिवाळी विधानसभेच्या अधिवेशनात कायदा करून हे ‘लव्ह जीहाद’ रोखण्यात यावे, अशी मागणी समाज माध्यमातून केली जात आहे.

भुसावळ शहरात गेल्या ऑगस्ट महिन्यात खडका रोड परिसरातील रहिवासी पेंटर व मोठा बांधकाम ठेकेदार कुप्रसिद्ध एजंटने वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीची फसवणूक करीत तिच्याशी लग्न केल्याची घटना घडली. पुणे, मुंबई २७ येथे नेत हिंदू मुलींची फसवणूक केल्याचे प्रकार सर्रास घडत असून असे प्रकार रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासह समाजापुढेही उभे ठाकले आहे.

‘लव्ह जिहाद’च्या प्रोत्साहनकर्त्याला शोधा

लव्ह जिहाद प्रकरणाला चालना देणारा शहरातील एक ठेकेदार आघाडीवर असून याचा शोध घेत या प्रकरणाला आळा घालण्यात यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

प्रवेशबंदी ठिकाणी मुलींना प्रवेश

शहरात नामांकित शाळेच्या विद्यार्थिनींना ज्या प्रार्थनास्थळात विशेषतः महिलांना प्रवेश वर्जित आहे. अशा ठिकाणी विद्यार्थिनींना
कशासाठी नेले? वा कसा प्रवेश दिला असा प्रश्न उपस्थित होत असून हा प्रकारही ‘लव्ह जिहाद’ च्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

संस्थेकडून समर्थन

त्यासंदर्भात चौकशीअंती संबंधीत आठ शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी संस्थेला दिले. मात्र संस्थेकडून या शिक्षकांवर निलंबन कारवाई झालेली नाही. यावरून संस्थेकडूनच अशा प्रकाराला समर्थन असल्याचे दिसून येत आहे. संबंधीत शिक्षकांवर केवळ निलंबन कारवाई नव्हे तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

भुसावळ लव्ह जिहाद विधानसभेत गाजणार !

दरम्यान, या संदर्भात जळगाव येथील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ येथील लव्ह जिहादचे प्रकरण विधानसभेत मांडावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात कायदा तयार करण्यात यावा, असे जनमत असून पालकमंत्री यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडणार असल्याचे सूचित केल्यामुळे हे प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---