सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, हे अधिवेशन २६ मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांकडून विधिमंडळात बैठक घेण्यात आली. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. शिवाय लाडक्या बहिणींसोबतच राज्याच्या जनतेसाठी अर्थमंत्री आणखी काय घेऊन येणार आहेत, याची उत्सुकता म्हणून सर्वांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.
हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब
दरम्यान,विरोधीपक्ष नेते पदावरून मविआमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस आणनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांकडून विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसचाच विरोधीपक्ष नेता होईल, असे वक्तव्य केलेय.
तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे, तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मविआचा विरोधीपक्ष नेता कोण होणार? याची राज्यात चर्चा सुरू आहे.