Pune: पुणे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणिराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या दोन नेत्यांची एकत्र येण्याची घटना त्यांच्यातील राजकीय तणाव आणि फूट यावर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
बारामतीनंतर पुन्हा एकत्र
याआधी बारामतीतील कृषी प्रदर्शनातही काका आणि पुतण्याची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यावेळी दोघेही एकत्र येतील, अशी चर्चा होती. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत त्यांची एकत्र उपस्थिती निश्चितच राजकीय वर्तुळात वेगळ्या अर्थाने चर्चिला गेली.
हेही वाच : Multibagger Stock: 1 लाख रुपयांचे झाले 91 लाख, तुमच्याही पोर्टफोलिओत आहे का ‘हा’ मल्टीबॅगर स्टॉक्स?
काका-पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या आधी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटले, आणि त्यानंतर एक बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी अजित पवार प्रेसिडेंट लिहिलेल्या केबिनमध्ये जात असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.
एकमेकांशेजारी बसणे टाळले
कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आला. अजित पवार आणि शरद पवार यांची खुर्ची एकमेकांसमोर ठेवण्याऐवजी, अजित पवार आणि जयंत पाटील यांची खुर्ची एकमेकांसमोर ठेवण्यात आली. यामुळे दोघांमधील तणाव आणि त्यांची राजकीय फूट आणखी उघड झाली आहे.