तरुण भारत लाईव्ह न्यूज। १२ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील स्टेट बँक चौकात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही तरुणांनी भर रस्त्यावर २ राउंड फायर केले असल्याची अफवा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेला पोलिसांकडून दुजोरा मिळाला.
जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांचे क्रिकेट सामने शिवतीर्थ मैदानावर रंगले होते. रविवारी अंतीम लढत होती. अंतीम लढत संपल्यावर तरुणांचा मोठा जमाव बाहेर पडला. रविवार असल्याने नागरिकांची देखील गर्दी होती. नेमके याच वेळी तरुणांच्या दोन गटात वाद झाला. स्टेट बँक चौकाजवळ तरुण काही तरुण पळत आले. तिघांनी जीव वाचावीत पळ काढला.
दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि कर्मचारी पोहचले. घटनास्थळी एक ट्यूब लाईट फोडलेली आढळून आली. परिसरात दोन वेळा काहीतरी मोठा आवाज झाल्याची माहिती काही दुकानदारांनी दिली. या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला , फायर झालेल्या घटनास्थळाची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. याप्रकारचे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.