---Advertisement---
जळगाव : पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपीशी तब्बल ३५२ वेळा मोबाईलवर संभाषण झाल्याचे समोर आले असून, यामुळे पोलीस दलात एकच खडबड उडाली आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलीस मुख्यकार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिलीय.
दोन पोलिसांची बदली
तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी गजानन देशमुख व संदीपाल जाधव यांच्याविरोधातही तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांची एलसीबीतून काढून पाचोरा व फत्तेपूर येथील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्याविरोधात एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील फरार आरोपीशी वारंवार संभाषण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथकाने तपास केला असता त्यात तब्बल ३५२ वेळा मोबाईलवर संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दोघांमध्ये हे संभाषण झाल्याचे बोलले जात आहे.
---Advertisement---
आक्षेपार्ह मजकूर नाही – अधीक्षक डॉ. रेड्डी
दरम्यान, माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व संशयित यांच्यात झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले आहे. पण त्यात तूर्त तरी कोणतेही आक्षेपार्ह मजकूर आढळून आलेला नाही, असे सांगितले.
कडक कारवाई करा – ना. गुलाबराव पाटील
या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिलीय.
पोटे यांची महिन्याभरापूर्वीच बदली
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांची महिन्याभरापूर्वीच एलसीबीतून जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मात्र, या घडामोडीनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.