विदेशी प्रवाशांसाठी ‘ई-अरायव्हल कार्ड’ १ एप्रिलपासून अनिवार्य

---Advertisement---

 

नवी दिल्ली : भारत सरकारने विदेशी प्रवाशांसाठी ‘ई-अरायव्हल कार्ड’ प्रणालीबाबत नवीन निर्णय लागू केला आहे. यानुसार १ एप्रिलपासून भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व विदेशी नागरिकांना आगमनापूर्वी डिजिटल’ ई-‘अरायव्हल कार्ड’ भरणे अनिवार्य ठरणार आहे.

हे प्रस्तावित नियम ७२ तासांच्या आत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. यामुळे पारंपरिक कागदी आगमन दाखला (डिसएम्बार्केशन कार्ड) रद्द केला जाईल. पर्यटन, व्यवसाय, अभ्यास किंवा इतर कारणांसाठी भारतात येणाऱ्या विदेशी नागरिकांना ७२ तासांच्या आत ‘ई-अरायव्हील कार्ड’ अधिकृत संकेतस्थळांद्वारे भरणे आवश्यक आहे. या नव्या डिजिटल पद्धतीचा उद्देश प्रवाशांची वाट पाहण्याची वेळ कमी करून, आगमन प्रक्रिया अधिक सुलभआणि वेगवान करणे हा आहे. आधीच्या कागदी पद्धतीत प्रवाशांना विमानात किंवा विमानतळावर घाईमध्ये माहिती भरावी लागायची. परंतु, आता ऑनलाईन पद्धत वापरल्याने हंगामाच्या वेळात आणि गर्दीतून मुक्त होण्यास मदत होणार आहे.

पूर्वीच्या परीक्षणानुसार काही प्रमुख विमानतळांवर या डिजिटल प्रणालीमुळे इमिग्रेशन काउंटरवरची प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कागदी आगमन कार्ड ३१ मार्चनंतर स्वीकारले जाणार नाही. डिजिटल प्रणाली ही भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रवास प्रक्रिया आधुनिकीकरणाचा एक भाग आहे आणि देशाचा प्रवेश अनुभव अधिक प्रभावी बनवण्यास मदत करेल, असे सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, विमानतळांवर आणि इमिग्रेशन कंट्रोल पॉइंटवर प्रवाशांना या डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---