---Advertisement---

बँकांमध्ये 32 कोटी रुपये ‌‘ईकेवायसी’च्या फेऱ्यात! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान लाभासाठी ईकेवायसी आवश्यकच

by team
---Advertisement---

Jalgaon News : गत वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बिगरमोसमी तसेच मॉन्सूनच्या अतिवृष्टीमुळे दीड लाखाहून अधिक क्षेत्र बाधित झाले होते. शासनस्तरावरून या नुकसान भरपाईपोटी 264 कोटींची मदत स्थानिक तालुकास्तरावर वितरित झाली आहे. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते ईकेवायसी न केल्याने 32 कोटी रुपये बँकांमध्ये ईकेवायसीच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मदत अनुदान लाभासाठी ईकेवायसी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी जानेवारी ते मे महिन्यात बेमोसमी-मान्सूनपूर्व, जून ते ऑक्टोबर दरम्यान मान्सूनसह डिसेंबर 2024 अखेर बेमोमसमी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे रब्बी तसेच खरीप पिकांचे नुकसान झाले होते. यात महसूल, कृषी विभागांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख 53 हजार 105 हेक्टरचे पंचनामे करण्यात आले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाने 264 कोटी 4 लाख 98 हजार रुपये मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. परंतु 26 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित असल्याने मंजूर अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकली नाही.

24 हजार शेतकऱ्यांची ईकेवायसी नाही

जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 दरम्यान, अति पावसामुळे 1 लाख 18 हजार 273.90 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले होते. यात 164 कोटी 75 लाख 45 हजार रुपये मदत अनुदान मंजूर झाले आहे. यातील 1 लाख 59 हजार 570 शेतकऱ्यांना अनुदान मंजूर आहे. त्यापैकी ईकेवायसी असलेले 27 हजार 979 शेतकऱ्यांचे जिल्हा लॉगीन केल्यानुसार 34 कोटी 23 लाख 85 हजार 992 रुपये अनुदान आहे. यातून 233 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीअंतर्गत 31 लाख 7 हजार 610 रुपये अनुदान वर्गदेखील झाले आहे. यात 24 हजार 798 शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे. अशा खात्यावर 29 कोटी 90 लाख 44 हजार 286 रुपये अनुदान मंजूर असूनही बँकांकडे पडून आहे.

शेतीचे नुकसान

जून महिन्यात मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पाणी साचून बांध-बंदिस्ती फुटल्याने 27 हेक्टर 69 आर शेतजमीन खरवडून निघाल्याने 143 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात 1 कोटी 30 लाख 1 हजार रुपये अनुदान रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसेच मॉन्सूननंतर डिसेंबर महिन्यात बेमोसमी पावसामुळे 514 हेक्टर 73 आर क्षेत्रावरील 1 हजार 145 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून 1 कोटी 55 लाख 18 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

45 हजार शेतकऱ्यांचे अनुदान वितरण

जिल्ह्यात मॉन्सून तसेच बेमोसमी अतिवृष्टीदरम्यान 1 लाख 53 हजार 105 हेक्टर क्षेत्रावरील 2 लाख 19 हजार 692 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून 264 कोटी 4 लाख 98 हजार रुपये या नुकसानीचे मदत अनुदान मंजूर आहे. यातील लॉगीननुसार 76 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 111 कोटी 65 लाख 64 हजार 112 रुपये संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वर्ग करण्यात आले आहेत. परंतु 26 हजार 909 शेतकऱ्यांचे ईकेवायसी नसल्याने 32 कोटी 23 लाख रुपये अजूनही बँकांकडे पडून आहेत.

मॉन्सूनपूर्वचे सव्वादोन कोटींवर अनुदान बँकांमध्ये

जानेवारी ते मे-जून 2024 दरम्यान बेमोसमी, मॉन्सूनपूर्व पावसामुळे 34 हजार 288.81 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले होते. यात 97 कोटी 61 लाख 34 हजार रुपये मदत अनुदान मंजूर झाले आहे. यातील 58 हजार 834 शेतकऱ्यांना अनुदान मंजूर आहे. त्यापैकी ईकेवायसी असलेले 48 हजार 462 शेतकऱ्यांचे जिल्हा लॉगीन केल्यानुसार 77 कोटी 41 लाख 78 हजार 120 रुपये अनुदान आहे. यातून 45 हजार 572 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीअंतर्गत 72 कोटी 83 लाख 22 हजार 286 रुपये अनुदान वर्गदेखील झाले आहे. यात 2 हजार 111 शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित आहे. अशा खात्यांवर 2 कोटी 31 लाख 91 हजार 234 रुपये अनुदान मंजूर असूनही बँकांकडे पडून आहे.

ईकेवायसी त्वरित करा

नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या नावे मंजूर असलेले अनुदान तालुकास्तरावर वर्ग करण्यात आले आहे, परंतु संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित बँक खात्याला ईकेवायसी जोडणी केलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई अनुदान मिळण्यासाठी ईकेवायसी करणे आवश्यक आहे.

  • आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती, जळगाव

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment