---Advertisement---

Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोठी कारवाई – ३१ नक्षलवादी ठार, २ जवान शहीद

by team
---Advertisement---

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले असून, दोन जवान शहीद झाले आहेत. तसेच, दोन जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रायपूर येथे हलविण्यात आले आहे.

बस्तर पोलिसांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध ही मोहीम राबविली. चकमकीनंतर घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा : India vs Pakistan: “चॅम्पियन्स ट्रॉफी तर जिंकायचीच पण भारताला…” काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान? पहा VIDEO

कशी झाली ही चकमक?

ही कारवाई छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क (राष्ट्रीय उद्यान) परिसरात करण्यात आली. बस्तरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांनी जंगलात नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू केले होते.

हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ

पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती की, मोठ्या संख्येने नक्षलवादी बिजापूरच्या जंगलात लपून बसले आहेत. त्यानंतर डीआरजी (District Reserve Guard), सीआरपीएफ (Central Reserve Police Force) आणि एसटीएफ (Special Task Force) यांनी संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतली. चकमकीत नक्षलवाद्यांनीही जोरदार प्रतिकार केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांना मोठा फटका दिला.

३१ नक्षलवादी ठार – अनेक शस्त्रास्त्रे जप्त

चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित शस्त्रे, बॉम्ब, स्फोटके आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

यावर्षी १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत ५० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.

सध्या परिसरात शोध मोहीम सुरू असून, मृतांची संख्या वाढू शकते. ही कारवाई अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment