संपूर्ण भारताचे आराध्यदैवत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात राज्यभरातून हजारो शिवप्रेमी, शिवभक्त आणि नागरिकांनी सहभाग होत. महाराजांच्या गड-किल्ल्यांवर आणि राज्यभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोठी घोषणा
हिंदवी स्वराज्य महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोठी घोषणा केली.
“शिवाजी महाराजांचे किल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून ते आमच्यासाठी मंदिरासारखे पवित्र आहेत. त्यामुळे त्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी विशेष पावले उचलली जातील.” असे फडणवीस यांनी जाहीर केले.
हेही वाचा : सुवर्णसंधी ! रेल्वेत ३२४३८ पदांसाठी भरती; अर्जकरण्यासाठी दोन दिवस बाकी
त्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून, या अंतर्गत लवकरच मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवली जातील. राज्य सरकारने यापूर्वीही किल्ले संवर्धनासाठी विविध योजना राबवल्या होत्या, परंतु आता आणखी प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. पर्यावरण संवर्धन, जल व्यवस्थापन, आणि उत्तम प्रशासन हे त्यांच्या राज्यका भारातील महत्त्वाचे घटक होते. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही महाराष्ट्राची सेवा करत आहोत,” असे फडणवीस म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, छत्रपतींनी भारताचा आत्मभिमान जागवला आणि आज १४० कोटी लोकसंख्येच्या देशासाठी ते एक प्रेरणास्रोत आहेत. “शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर स्वराज्याची स्फूर्ती मिळते. हेच तेज आणि स्फूर्ती घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत असतो,” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, पाच वर्षांनी म्हणजेच २०३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ४००वी जयंती अतिशय भव्य स्वरूपात साजरी करण्यात येईल. या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबवले जातील आणि महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवले जातील.