नवापुर : आयसर टेम्पोच्या चालकाला डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहचालक गंभीर जखमी झाला आहे. शेख रियाकत शेख हबीब रा. खुलताबाद जि.औरंगाबाद असे मयत चालकाचे नाव आहे. सोमवारी, ९ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गसहा वरील कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचादर गावाच्या शिवारात ही घटना घडली. पहाटे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद हुन अद्रक भरून गुजरात राज्यातील सुरत येथे जाणारा आयसर टेम्पो (क्र. एम.एच.२० ई.एल.२०६७) वरिल चालक कोंडाईबारी घाट येथून भरधाव वेगात येत असतात. खांबचौदर गावाच्या शिवारात डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत आयसर टेम्पोची पुर्ण कॅबीन चक्काचूर होवून चालक शेख रियाकत शेख हबीब रा. खुलताबाद जि.औरंगाबाद हा जागीच ठार झाला. तर सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली.
यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोउपनि अमृत पाटील, हे कॉ. संजय माळी, साहेबराव खांडेकर, योगेश सोनवणे, चालक राजु कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने मयत चालक व जखमी सहचालकाला बाहेर काढले, सहचालक जबर जखमी असल्याने त्यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.