राज्यात ‘जेएन.1’चा शिरकाव; जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

जळगाव : विषाणूचा नवा जेएन१ ची बाधा झालेल्या रुग्ण राज्यात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा गतीमान करण्यावर गुरुवार २१ रोजी भर देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी कॉन्फरन्स घेत आरोग्य यंत्रणेबाबतच्या विविध विषयांची माहिती घेतली. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत राज्यात वाढ होत असल्याने आजच्या आरोग्य यंत्रणेच्या आढावा बैठकीना विशेष महत्व दिले गेले.

संध्याकाळी आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेत कोरोना संदर्भात उपाययोजने करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच चालू स्थितीला उपलब्ध आरोग्य सुविधा तसेच यंत्रणा कशी आहे. याचा त्यांनी आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाचण्या करण्याच्या पध्दती गतीमान करण्यावर भर दिला जात आहे. याअनुषंगाने चाचणी किट यंत्रणेकडे उलब्ध ठेवणे क्रमप्राप्त आहे.

समन्वय – कार्यतत्परतेवर भर
दरम्यान कोरोनाचे रुग्ण केरळ पाठोपाठ महाराष्ट्र तसेच गोवात आढळून आल्याने केंद्र सरकारने राज्यांना सतर्कता बाळगण्याची सूचना केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स घेत आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे तसेच सावध असण्याचे निर्दे श केले. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेची कार्यतत्परता याचा आढावा घेतला. यापाठोपाठ आरोग्य मंत्र्यानी आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेतली.

तीन राज्यात आढळले रुग्ण
कोरोना विषाणूच्या जेएनवन या उपप्रकाराचे तीन राज्यात रुग्ण आढळून आल्याची माहिती नीती आयोगाने दिली. झारखंड, कर्नाटकातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. तथापि यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात अशी, सूचना त्यांनी केली.

यंत्रणेला तत्पर राहण्याच्या सूचना
कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेतला कोरोना चाचणी करण्यावर भर देण्यात आला असून त्यानुसार तपासणी किट सुविधा तत्पर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, मनपा, नपा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय इत्यादी ठिकाणी यंत्रणा सतर्क ठेवण्याचेही आजच्या या बैठकीमध्ये भर देण्यात आला. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी, सिव्हील सर्जन यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख गुरूवारी दिवसभर या बैठकीत व्यस्त होते.