जळगाव : सध्याच्या 21व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण वावरत आहोत. या युगामध्ये डिजिटल तंत्रज्ञान पुढे आले असून अजूनही काही भागात वयस्कर व्यक्ती शिक्षित झालेले नाहीत. दैनंदिन जीवनात वावरत असताना अशिक्षित राहिल्यामुळे त्यांची फसगत होते. या लोकांना किमान लिहिता वाचता यावे यासाठी “उल्लास “नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी केले.
मंगळवार दि.१७ रोजी भुसावळ येथील नवोदय विद्यालयात जिल्हास्तरीय “उल्लास “ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सहाय्यक योजना अधिकारी शिक्षण संचालनालय पुणे येथील डी एस शिंदे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्रभारी प्राचार्य प्रतिभा भावसार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, एफ. ए. पठाण, विजय सरोदे, प्राचार्य आर. आर. खंदारे आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणातून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी सांगितले की, आजच्या युगात शिक्षण ही फार मोठी गरज झाली आहे. शिक्षणामुळे व्यावहारिक जगात वावरणे सहज सोपे होते. शिक्षण हा जीवन जगण्याचा आत्मा असल्याने अशिक्षित व्यक्तींनी देखील शिक्षणाचे महत्व ओळखून ऊल्लास अभियानाच्या माध्यमातून शिक्षित झाले पाहिजे असे आवाहन देखील श्री.अंकित यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक कल्पना चव्हाण यांनी केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते पंधरा तालुक्यांनी साक्षरता अभियानावर लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन करून याची माहिती घेतली. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी तर आभार प्रतिभा भावसार यांनी मानले.
शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, बी. डी. धाडी, एस. एस. अहिरे, बी.पी. वारके, एम. आर. चौधरी, जे. बी. पाटील यांनी कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी प्रयत्न केले. या वेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा, गोजोरे ता. भुसावळ द्वितीय जिल्हा परिषद शिक्षक, मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर तृतीय जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव ता. भुसावळ उत्तेजनार्थ जिल्हा परिषद शाळा राजनी, ता. जामनेर यांनी पारितोषिक पटकावले.