---Advertisement---

बनावट वाहनांच्या नोंदी प्रकरण ; दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त धुळ्यात

by team

---Advertisement---

नंदुरबार : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी संगनमताने बनावट वाहनांची बॅकलॉग नोंदणी करुन शासनाच्या महसुलीचे नुकसान केले होते. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते मे २०२२ मध्ये घडला होता. यात त्यांनी शासनाची फसवणूक सुद्धा केली आहे.

या अवैध कार्यात सहभागी असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर चौकशी करुन कारवाई करावी, अशी लेखी मागणी जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेंगे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (दक्षता) यांच्याकडे निवेदन दिले होते. याच प्रमाणे गणेश ढेंगे यांनी मागील महिन्यात २४ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (दक्षता) विभागाकडे ही तक्रार केली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त (दक्षता) विभागाचे सिद्धार्थ गाडे हे धुळे नंदुरबार दौऱ्यावर येवून गेले. धुळे भेटीत त्यांनी गणेश ढेंगे यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्याकडे नंदुरबार येथील १३३ वाहनांच्या बनावट बॅकलॉग नोंदी प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात अडकलेल्या लिपीक व टंकलेखक जयसिंग बागुल, वरिष्ठ लिपीक कांतिलाल अहिरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्यासंदर्भात संपूर्ण लेखी माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . तसेच काही पुरावे देखील डेंगे यांनी वरील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. यावरुन आता नंदुरबार येथील १३३ वाहनांच्या बनावट नोंदी प्रकरणाची कसून चौकशी होवून संबंधीत कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होण्यास वेळ लागणार नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment