---Advertisement---

प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा अपघात, रुग्णालयात केलं दाखल

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तो गुरुवारी पहाटे इमारतीच्या जिन्यांवरून पडला. यात तो दुखापत झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिन्यांवरून पडल्याने जुबिनच्या कोपर, बरगड्या आणि डोक्याला दुखापत झाली आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नोटियाल या गाण्यामुळे तरुणाईच्या सर्वाधिक आवडीचा गायक बनला 
शेरशाह चित्रपटातील राता लंबिया हे गाणं आठवतं? त्या गाण्यानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. त्यामुळेच की काय जुबिन हा कमालीचा लोकप्रिय देखील झाला. त्यापूर्वी त्याच्या दिल गलती कर बैठा है या गाण्यानं देखील जुबिन तरुणाईच्या सर्वाधिक आवडीचा गायक म्हणून लोकप्रिय झाला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment