---Advertisement---

सोयगाव आगारात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप

---Advertisement---

सोयगाव : सोयगाव बस आगारातील एकूण ४ कर्मचारी शनिवारी (३१ मे ) रोजी सेवानिवृत्त झाले. सोयगाव बस आगारातील कर्मचाऱ्यातर्फे त्यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोयगाव बस आगार प्रमुख मनिष जवळीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे होते. यावेळी बस आगार प्रमुख मनिष जवळीकर यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून प्रवासी सेवा करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.


आगारातील लेखाकार कृष्णा कावले, चालक माधव पांडूरंग पाटील, चालक बाबुलाल दोधाटे आणि वाहक सय्यद गुलाब यांचा एस‌.टी.प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनतर्फे सह पत्नीक व सहकुटुंब यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनां सजविलेल्या एसटी बस मधून मिरवणूक काढून बस डेपो ते सोयगाव स्थानकापर्यंत डीजे मिरवणूकिद्ववारे सह परिवार निरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांचे स्नेहीजन आणि एस.टी.कर्मचाऱ्यांनी यांनी सहकुटुंब उपस्थित राहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सिल्लोड बस आगाराचे प्रमुख विजय काळवणे,पेन्शनर सोयगाव तालुका अध्यक्ष प्रमुख आबासाहेब बाविस्कर,कामगार संघटना सचिव संतोष पाखरे, जयराम सूर्यवंशी,कैलास बागुल, अध्यक्ष राजू भोपे, कामगार नेते सुरेश हळनोर, मधुकर शिंदे, विष्णू सोनवणे, रमेश पायघन, अन्नासाहेब ढेपले, ज्ञानेश्वर वाडेकर, वर्जन जाधव, राजू बाविस्कर, मधुकर आमटे, सुधाकर बोराडे, रमेश साबळे, सुनील पवार, अशोक तायडे, सह बस आगारातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णा ढेपले,मनोज चव्हाण, अशोक तायडे, रमेश साबळे, विनोद जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले तर आभार सतीश पाटील यांनी मानले.


मी दि.७ जानेवारी २००१ एसटी बस सेवेत नोकरीत रुजू झाले होते तर मला पहिले सोयगाव बस आगार मिळाले होते.मी दि.७ जानेवारी २००१ ते ३१ मे २०२५ असे माझे नोकरीचे एकूण २५ वर्ष सोयगाव बस आगारात नोकरी केली.त्याबद्दल मी माझ्या कार्यकाळातील आगार प्रमुख,तसेच सर्व कर्मचारी व सोयगावसह परिसरातील नागरिकांचे मला वेळेवर मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे
माधव पाटील,चालक

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment