---Advertisement---

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू,

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३। समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. अशातच आज पुन्हा जिल्ह्यात मेहकरजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार, तर ७ जण जखमी झाले आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एक कार औरंगाबादहून शेगावला जात होती. गाडीत एकूण ९ प्रवासी होते. वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. या भीषण अपघातातील मृतांमध्ये २ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. तर ७ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment