---Advertisement---

संतापजनक ! बापाचं चार महिन्यांच्या मुलीसोबत हृदय पिळवटून टाकणार कृत्य

by team
---Advertisement---

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील अत्याचाराच्या घटनेनें राज्यासह संपूर्ण देश हादरला आहे. इथे नराधमाने एका सव्वीस वर्षीय मुलीला विश्वासात घेऊन स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये सकाळी पाच वाजत एक नव्हे तर दोंन वेळा अत्याचार केल्याची घक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी नराधमाला तीन दिवसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावातून अटक केली होती. त्यानंतर न्यालयाने त्याला १ २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशा घटनांमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चाललंय. पुण्यातील हि घटना ताजी असतांनाच मुंबईमधील घाटकोपरमधून पुन्हा महारष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली आहे . एका बापाने आपल्याच चार महिन्याच्या मुलीला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे .

हेही वाचा : धक्कादायक ! औषध सांगून विद्यार्थिनींना द्यायचा दारू अन्…, शिक्षकाचा संतापजनक प्रकार

मुंबईमधील घाटकोपरमध्ये एका बापाने आपल्याच चार महिन्याच्या पोटच्या पोरीचा खून केल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये घडली. संजय बाबू कोकरे असे या निर्दयी बापाचे नाव आहे.

संजय बोकरे हा आपल्या कुटुंबासह घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये वास्तव्यला होता. चार महिन्यांपूर्वी बोकरे दाम्पत्याच्या घरात मुलीचा जन्म झाला होता. परुंतु संजय हा आपल्याला मुलगी नको होती म्हणून मुलीच्या जन्मापासूनच तिचा तिरस्कार करत होता.

हेही वाचा : दुर्दैवी ! वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीने केलं असं काही, दरवाजा उघडल्यानंतर सर्वच थक्क

दरम्यान, मुलीची आई काही कामानिमित्त बाहेर गेली असता या नराधम बापाने आपल्याच चार महिन्याच्या मुलीचा पाळण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. मुलीची आई घरी आली असता हा संपूर्ण प्रकार पाहून तिला जबर मानसिक धक्का बसला. तिने तात्काळ पोलिसांना या बद्दलची माहिती कळवली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

या विचित्र आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र एकच खडबळ उडाली आहे. अशा घटनांमुळे महारष्ट्रातील कायदा व सुवेवस्थेवरील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment