पुन्हा कोरोनाची भीती…

(चंद्रशेखर जोशी)
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग काळात दुर्दैवाचे तांडव दिसून आले, अनेक संसार उद्ध्वस्त झाले, प्रचंड वाताहत या काळात पहायला मिळाली. अनेकांचे जीव गेले तर बऱ्याच जणांना मानसिक अपंगत्व आले. एक ना अनेक किस्से आजही अंगावर शहारे आणणारे ठरतात. कोविड १९ चा पहिला रूग्ण सर्वात अगोदर जळगाव शहरात परदेशवारी करून आलेल्या मेहरुण परिसरातील एक इसम आढळला. एप्रिल २०२० च्या शेवटच्या आठवड्यात हा रूग्ण आढळला होता आणि पाहता-पाहता तांडव सुरू झाले. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका जिल्हावासीयांना सहन करावा लागला. कोरोना संसर्गामुळे या जिल्ह्यात सुमारे १ लाख ४५ हजार ८०० नागरिक बाधित झाले होते, तर १ लाख ४० हजार १६५ बाधित चांगले उपचार मिळाल्याने बरे होऊन घरी परतते जवळपास २५०० पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या या वादळामुळे केवळ जीवित हानी झाली काय ? तर याचे उत्तर नकारात्मकव येईल. अनेक व्यवसायांना याचा फटका बसला. हजारो हातांचे काम थांबले, अनेकांना शिक्षण सोडून रोजी-रोटीसाठी भटकावे लागले व अद्यापहीही झळ काही क्षेत्रात जाणवते आहे. रुग्णालयात दाखल व्यक्ती घरी परत येईलच याची खात्री तेव्हा नसे आणि एखाद्याचा बळी गेला की त्याला घरी आणणेदेखील शक्य होत नसायचे, मरण पावलेल्यास त्याचे नातेवाईक घेण्यास येत नसत तर रुग्णालयात सेवा देशान्यांकडून अनिडान मयतास दिला जायचा. या आठवणींना उजाळा देण्याचा प्रपंच असा की आरोग्य विभागाने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

देशातील काही भागात नव्याने हा संसर्ग डोके वर काढतोय, हळूहळू रुग्ण संख्या वाढतेय. गत काळात आपल्या स्थानिक ऋणसेवेचे वाभाडे निघाले आता थंडी वाढत असल्याने काहीशी भीती वाढतेय. काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागात जेएन-१ या कोविडच्या नव्या विषाणूची विविध राज्यात नोफ्लद झाली आणि साह‌जिकच पूर्वीच्या अनुभवांमुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली. कोविडचा नवा विषाणू हा सौम्यच असून, या विषाणुच्या संसर्गामुळे रुग्ण गंभीर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. या विषाणू प्रकाराची कोणतीही धास्ती बाळगू नये व चिंताही करू नये केवळ काळजी करणे गरजेचे आहे. मात्र अनेक जण काळजी करू नये म्हटले म्हणजे बिनधास्त होतात. त्यामुळेच हा फैलाव वाढतो. पहिल्या लाटेपेक्षा दूसरी गंभीर होती, हे सारेच जाणतात. त्यामुळे त्रास आपल्याला होऊ नये व आपल्याला झाला तर दुसन्याला होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. सावधता यासाठी की, जेएन-१ या नव्या विषाणू प्रकाराविषयी अजूनही फारशी शास्त्रीय माहिती समोर आलेली नाही. आरोग्य यंत्रणेकडील माहितीनुसार, हा विषाणू प्रकार झपाट्याने पसरत असल्यामुळे आजारी व्यक्त्तत्त्रपासून दूर रहाणे तेवढेच गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेने विविध प्रकारची तयारी तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करणे गरजेचे आहे. गत काळातील अनुभव पहाता बेसावध राहून उपयोग नाही. सिव्हिल अंतर्गत असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सेवा-सुविधाविषयी पारंपरिक तक्रारी आजही आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी ठिकाणावर नसतात, तर बन्याच ठिकाणी औषधीचा तुटवडा असतो. जिल्हाप्रमुख येथे भेटी देतात पण त्या ‘अर्थपूर्ण’ असतात. सामान्य रूग्णालयातील परिस्थिती फार वेगळी नाही. तेथील उदाहरण तर अति गंभीर आहेत. बाथरुमध्ये रूग्ण मरून पडल्यावर दोन-तीन दिवस यंत्रणेला शुद्ध नसते हा किती गंभीर प्रकार पण तो येथे घडला. आरोग्य सेवेचा अनोखा जळगाव पॅटर्न’ येथे दिसून आला. यंत्रणेचे वाभाडे निघाले त्यातील काही अधिकारी आजही येथे कार्यरत आहेत त्यामुळे विशेष काळजी वाटते. कोविडच्या नव्या प्रकारामुळे यंत्रणेला शासनाकडून सतर्कता बाळगावी म्हणून सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. विषय फार गंभीर नसला तरी सावधता ही फार गरजेची आहे. आता जोडीला वैद्यकीय महाविद्यालय व तेथील अधिष्ठाता आहेत. ही जमेची बाजू होय. नेमके काय काय करणे गरजेचे असते हे वेगळे सांगण्याची आता गरज नाही. त्यामुळे कोविडवर मात करण्यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगणे आता गरजेचे झाले आहे.