तरुण भारत लाईव्ह । ७ जानेवारी २०२३ । अहमदाबाद येथील शाहीबाग परिसरात एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली. यात एका १५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका १५ वर्षीय मुलीचा यात मृत्यू झाला आहे. ही मुलगी घरी एकटीच होती. घरातील इतर सदस्य बाहेर गेले असताना ही घटना घडली. अशात आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सातव्या मजल्यावर आग लागल्यानंतर ही आग आणखीन वरती पसरत चालली आहे. त्यामुळे वरच्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप खाली आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.