---Advertisement---
जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौक येथील प्रसिद्ध हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंगचे प्रकरण गेल्या आठवड्यापासून गाजत होते. या याप्रकरणी संबंधितांना दंडाची नोटीस बजविण्यात आलेली होती. अखेर हॉटेल रूपाली यांच्यामार्फत ६०१८०/– रुपये दंड भरण्यात आला असून, तात्पुरता का होईना कारवाईचे संकट टळले आहे. तसेच संबंधितांना ५ दिवसाच्या आत कागदपत्रे सादर करण्याची पुनश्च दुसरी नोटीस अदा करण्यात आलेली आहे.
ॲड. पियुष पाटील यांची मनपा प्रशासनावर नाराजी
शहरातील स्वातंत्र्य चौक येथील प्रसिद्ध हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत होर्डिंग हे जळगावकर ०७ वर्षांपासून बघत आहोत. याचे आपण सर्व साक्षीदार आहोत.
एकीकडे सामान्य बॅनर व्यावसायिक/सामान्य नागरिक यांनी असे बॅनर लावले असते तर मनापा प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितांकडून दंड वसूल केला असता. मात्र मनपा प्रशासन हे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप ॲड. पियुष पाटील यांनी केला.
प्रशासनाने पारदर्शक कारवाई म्हणून GPS प्रणालीचा वापर करून सदर अनधिकृत होर्डिंग हे किती वर्षे होते हे व्हेरिफाय करणे गरजेचे होते तसेच या दंडाची आकारणी करत असताना त्याला व्याजदर जोडणे अपेक्षित होते एवढेच नव्हे तर तब्बल ०७ वर्षा अनधिकृत होर्डिंग लावल्या प्रकरणी सुरुवातीलाच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु केवळ १७ अंदाजीत महिन्यांचाच दंड करण्यात आल्यामुळे मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत मी आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित विभागाच्या उपायुक्त यांची तक्रार करणार असल्याची माहिती ॲड.पियुष पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकांद्वारे दिली आहे.









