खळबळजनक; दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, काय घडलं ? मुंबई पोलीस अलर्ट मोडवर…!

---Advertisement---

 

बॉलिवूड सिनेविश्वातून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार झालायची माहिती आहे.

तपासात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार झाल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे फिल्म इंडस्ट्रीसह चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र गोळीबार का केला याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलेलं नाही .

अज्ञात व्यक्तीने रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर चार राऊंड फायर केल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर जुहू परिसरात पोलीस सतर्क झाले असून, रोहित शेट्टी यांच्या घराभोवती कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून प्रकरणाची गंभीरपणे चौकशी सुरु असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, धमकी किंवा इतर कोणता कोन याबाबत पोलिस सर्व शक्यता तपासत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, रोहित शेट्टी हे अ‍ॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जातात. सिंघम, गोलमाल, चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते सध्या एका बायोपिक प्रोजेक्टवर काम करत असल्याचीही माहिती आहे.
या संपूर्ण घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, पुढील अपडेट्ससाठी तपास यंत्रणा सक्रिय आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---