Video : चाळीसगावमध्ये गोळीबार, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परिसरातील घटनेनं खळबळ

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत हवेत गोळीबार केला.

बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले यांच्या घरासमोर हा गोळीबार करण्यात आला असल्याचे समजते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.

सीसीटीव्हीत कैद गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, त्यांची हालचाल सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

झडतीत हत्यारे व काडतुसे जप्त संशयित आरोपींच्या घराची झडती घेतली असता, तेथून घातक हत्यारे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून कारवाई सुरू

चाळीसगाव पोलिसांनी या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांना आवाहन

या घटनेमुळे चाळीसगावमध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.