---Advertisement---

पतीचा हैवानपणा! पाच मित्रांना घरी बोलावले अन् अपंग पत्नीवर…, भयावह घटना

by team
---Advertisement---


पती-पत्नीचे नाते हे खूप पवित्र आणि विश्वासाचे नाते मानले जाते. या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आलाय. अंगावर काटा आणणारा हा प्रकार असून या घटनेत चक्क पतीने आपल्या पाच मित्रांसह आपल्या अपंग पत्नीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेत एका अपंग महिलेवर तिचा पती आणि पाच मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.यात नराधम पतीला अटक केली आहे आणि या घृणास्पद गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर पाच संशयितांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून नराधम पती त्याच्या सासरच्या घरात राहत होता. या घटनेच्या दिवशी पीडितेचे वडील आणि आई घरी नव्हते. पती आणि त्याच्या मित्रांनी दारूच्या नशेत हा अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.

या घटनेनंतर १४ मार्च रोजी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत नराधम पतीला अटक केली आहे. सुब्रत डे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी जोगेंद्रनगर परिसरात असलेल्या त्याच्या सासरच्या घरात राहत होता.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार इतर आरोपींचा शोध सुरू आहे,” असे आमटाली पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुष्मिता देबनाथ यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment