Jalgaon News : माजी नगरसेवक दाम्पत्याची भाजपमध्ये घर वापसी

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षांला विविध सामाजिक संघटनांतर्फे तसेच राजकीय पक्षांतर्फे आ. राजूमामा भोळे पाठिंबा देण्यात आहे. यात काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षांत प्रवेश केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दाम्पत्याने आ. भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत घर वापसी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नागसेवक दाम्पत्य काही कालावधीपासून भारतीय जनता पक्षापासून दूर गेले होते. मात्र, आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत माजी नगरसेवक नितीन पाटील व माजी नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी आज रविवार, १७ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षात पक्षनेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत सक्रियतेवर शिक्कामोर्तब केला आहे हा छोटेखानी सोहळा भारतीय जनता पक्ष कार्यलयात पार पडला.

याप्रसंगी आमदार तथा महायुतीचे जळगाव शहर मतदार संघाचे उमेदवार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, विधानसभा समन्वयक विशाल त्रिपाठी, जेष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव मुकुंद मेटकर, सचिन पानपाटील उपस्थित होते. यावेळी भाजपाचे मफलर देऊन उभयतांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी राजूमामा भोळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी झोकून देणार असल्याचे श्री. व सौ. जयश्री नितीन महाजन यांनी वेळा सांगितले.