जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच शिर्डी येथे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वार पार पडला. या अधिवेशनाला पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही उपस्थिती लावली होती. यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी चर्चा होतं होती. दरम्यान आज १४ रोजी येथील महायुतीचा मेळाव्यात माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलतांना दिलीप वाघ म्हणाले की, अजितदादा पवार यांनी महायुती सोबत गेल्यानंतर आम्ही देखील पाचोरा-भडगाव मतदार संघात महायुती सोबत येतं काम सुरु केले आहे आणि यापुढे देखील लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील आपण महायुती सोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले असून त्या सोबतच पाचोरा भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.