---Advertisement---
भारत आणि चार युरोपियन देशांसोबत मुक्त व्यापारासंदर्भातील चर्चा पूर्ण झाली असून सप्टेंबर महिन्यापासून कराराची अंमलबजावणी होणार आहे. या देशांमध्ये आइसलैंड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे आणि हे सर्व देश युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात् ईएफटीएचे सदस्य आहे. व्यापारी करारामुळे भारतात १५ वर्षांत १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी दिली.
---Advertisement---
स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या गोयल यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, चार युरोपियन देशांसोबत मुक्त व्यापार करासंदर्भात नुकतीच चर्चा झाली. बैठकीला आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुक्त व्यापार करार सप्टेंबरपासून अंमलात येईल याची मला पूर्ण खात्री आहे.
दोन्ही बाजूंनी १० मार्च रोजी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्या. भारतात या गटाकडून १५ वर्षात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक येईल. स्विस घड्याळे, चॉकलेट आणि पॉलिश केलेले हिरे यासारख्या अनेक उत्पादनांवर शून्य शुल्क आकारले जाईल. या कराराला चारही देशांच्या संसदेने मान्यता दिली आहे. या दौऱ्यात स्वित्झर्लंडच्या १२ पेक्षा अधिकत कंपन्यांसोबत द्विपक्षीय बैठका झाल्या. यापैकी बहुतांश कंपन्यांनी भारतात औषध, सायबर सुरक्षा आणि यंत्रसामग्री उत्पादनासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.