---Advertisement---

मित्राची मोटारसायकल लावली अंगणांत, रात्रीच चोरट्यांनी केली लंपास

---Advertisement---

---Advertisement---

शहादा : तालुक्यातील वडाळी येथील एका घराच्या अंगणात रात्री उभी केलेली पल्सर मोटारसायकल ( MH-39 AK-1079) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ जुलैच्या रात्री ते २६ जुलैच्या सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मोटारसायकलचे मालक तुषार राजकुमार माळी (वय ३५, व्यवसाय-शेती, रा. वडाळी) यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार माळी यांची मोटारसायकल त्यांचा मित्र गणेश दिलीपगिर गोसावी (रा. वडाळी) याने शुक्रवारी (२५ जुलै) रोजी खाजगी कामासाठी नेली होती. काम आटोपल्यानंतर गणेश याने रात्री आपल्या घराच्या अंगणात मोटारसायकल उभी केली. दुसऱ्या दिवशी, शनिवारी (२६ जुलै )रोजी सकाळी सहा वाजता गणेश यांना अंगणात लावलेली मोटारसायकल दिसली नाही.

त्यांनी आणि तुषार माळी यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली, परंतु मोटारसायकल मिळून आली नाही. यावेळी त्यांची मोटरसायकल चोरीस गेल्याची बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा क्रमांक १३४/२०२५ नुसार नोंद केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---