---Advertisement---
Nilesh Kasar Murder : जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक चिंतित आहेत. अशात पुन्हा एका २७ वर्षीय तरुणाची दोन मित्रांनीच हत्या करून, मृतदेह तलावात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलेश राजेंद्र कासार (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जामनेर येथील निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण पाच (१५ डिसेंबर) दिवसांपासून बेपत्ता होता. त्याची दुचाकी जळगाव जवळील रामदेववाडी परिसरात आढळल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान, गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुजरातमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी पूर्ववैमनस्यातून निलेशचा खून करून मृतदेह पोत्यात भरून तलावात टाकल्याची कबुली दिली.
पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह ताब्यात घेत, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
खुनाच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन दिवसाआड खुनाच्या घटना समोर येत असून, या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक चिंतित आहेत.









