---Advertisement---
जळगाव : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी आठ वर्षानंतर अटक केली आहे. नीलेश प्यारेलाल कडेल (लोणजे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप या आरोपीवर असून, प्रकरण दाखल झाल्यापासूनच तो लपून, सतत ठिकाणे बदलत फरारी जीवन जगत होता. पोलिस सतत त्याच्या मागावर होते. गेल्या आठ वर्षांपासून आरोपीचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू ठेवला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला आले.
पोलिस हवालदार विकास चव्हाण आणि संदीप माने यांनी आरोपीची ठोस माहिती गोळा केली. ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, प्रकरणातील इतर संबंधित बाबींची चौकशीही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास चाळीसगाव पोलिस करत आहेत.









