---Advertisement---
जळगाव : सोने-चांदीच्या भावात पाच दिवसांपासून चढ-उतार सुरूच असून, सोन्याच्या भावात पुन्हा एक हजार रुपयांनी घसरण होऊन ते एक लाख २३ हजार रुपयांवर आले आहे. तसेच चांदीच्या भावात १५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५५ हजार रुपयांवर आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार रुपयांवर पोहोचले होते.
त्यानंतर २१ रोजी १७०० रुपयांची घसरण झाली व २२ रोजी पुन्हा तेवढीच भाववाढ झाली. २३ रोजी एक लाख २४ हजार रुपयांवर स्थिर राहिल्यानंतर २४ रोजी त्यात एक हजार रुपयांची घसरण झाली व सोने एक लाख २३ हजार रुपये प्रती तोळ्यावर आले.
२१ दुसरीकडे नोव्हेंबर रोजी चांदीच्या भावात ४७०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५३ हजार ३०० रुपयांवर आली. २२ रोजी त्यात ३२०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५६ हजार ५०० रुपयांवर पोहोचली व २३ रोजी याच भावावर स्थिर राहिली. २४ नोव्हेंबर रोजी १५०० रुपयांची घसरण होऊन चांदी एक लाख ५५ हजार रुपये प्रती किलोवर आली.









