---Advertisement---
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोने एक हजार ७०० रुपयांनी वधारून एक लाख २४ हजार रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या भावात तीन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ५६ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.
चार दिवस एक लाख ५८ हजार रुपयांवर स्थिर राहिलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी चार हजार ७०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५३ हजार ३०० रुपयांवर आली होती. दुसऱ्याच दिवशी, तीन हजार २०० रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे चांदी एक लाख ५६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. अशाच प्रकारे शुक्रवारी एक हजार ७०० रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या भावात शनिवारी पुन्हा तेवढीच वाढ होऊन ते एक लाख २४ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यातील सोन्याचे दर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२५,९९० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१५,५०० रुपये आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१५,३५० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२५,८४० रुपये आहे.









