---Advertisement---
जळगाव : घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. यामध्ये चांदीत ३५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५८ हजार ५०० रुपयांवर तर सोन्याच्या भावात २३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २५ हजार ३०० रुपयांवर पोहचले आहे.
सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. मध्यंतरी दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात मोठी भाववाढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक विक्री वाढविली व भाव कमी होऊ लागले. त्यानंतरही दलालांकडून कधी विक्री तर कधी खरेदी वाढविली जात आहे.
त्यामुळे भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे २४ नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या भावात २३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २५ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
तसेच १५०० रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात दुसऱ्या दिवशी, २५ रोजी ३५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.









