दिलासादायक ! सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, वाचा काय आहेत आजचे दर ?

जळगाव ।  सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जळगाव सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झालीय.

आजचे दर 

२४ कॅरेट सोनं (प्रति तोळा): ₹७६,७५० (विनाजीएसटी)
चांदी (प्रति किलो): ₹९१,००० (विनाजीएसटी)

मागील आठवड्यातील बदल

सोने: ₹१,७०० प्रति तोळ्याने वाढ
त्यानंतर ₹१,६०० प्रति तोळ्याने घसरण

चांदी: ₹५,५०० प्रति किलो वाढ त्यानंतर ₹४,००० प्रति किलो घसरण

या आठवड्याचे विश्लेषण 
सोने: मागील दोन दिवसांत ₹५५० प्रति तोळ्याने स्वस्त.
चांदी: मागील दोन दिवसांपासून दर स्थिर.
जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किमतींवर लक्ष ठेवा. किमतीतील स्थिरता किंवा आणखी घसरण झाल्यास योग्य वेळ साधता येईल.