दिलासादायक! दसऱ्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दारात घट, काय आहेत सध्याचे भाव जाणून घ्या सविस्तर…

Gold Silver Rate : अवघ्या तीन दिवसांवर दसऱ्याचा सण येऊन ठेपला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडालेली होती. परंतु सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दारात घट झाल्याने ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळालेला आहे. सध्या सोन्याचा भाव 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीचा भाव हा 88 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 74834 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 88290 रुपये प्रति किलो आहे.

तर जळगावातील सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 69486 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 75800 रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी 93000 रुपये प्रति किलो इतका आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लग्नाच्या हंगामात सोन्याची किंमत मागील सर्व रेकॉर्ड मोडित काढणार असल्याचे भाकित सराफ व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पक्ष पंधरवाड्यापासून सोन्याने दरवाढ नोंदवली आहे. गेल्या पंधरा दिवसात सोन्यात 5000 रुपयांनी तर चांदीतही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.