सरकारी बँकेत नोकरी हवी आहे ? तर मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी….!

---Advertisement---

 

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची आवड असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये सध्या ग्रुप बी डेव्हलपमेंट असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सरु झाली आहे.

सदर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट nabard.org ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी २०२६ आहे.

या नोकरीबाबत संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे…⬇️

पदाचे नाव:

सदर भरती मोहिमेत ग्रुप बी डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) या पदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण १६२ रिक्त पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

डेव्हलपमेंट असिस्टंट : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) : (i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान. (iii) उमेदवाराला इंग्रजीतून हिंदीमध्ये आणि हिंदीतून इंग्रजीध्ये भाषांतर करता आले पाहिजे.

सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२६ रोजी २१ ते ३५ वर्षे असावे.

अर्ज शुल्क :

इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्जासोबत ₹५५० शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती आणि अपंगत्व श्रेणीतील उमेदवारांसाठी ₹१०० शुल्क आहे.

निवड प्रक्रिया :

या सरकारी नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स ( पूर्व परीक्षा), मेन्स, लँग्वेज प्रोफेशियंसी टेस्टद्वारे होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---