जळगाव : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज मंगळवार १४ रोजी दुपारी १२.३० वाजता थोर संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जिल्हाअघ्यक्ष , संस्थेचे सचिव माननीय अशोक लाडवंजारी हे होते. तर प्रमुख अतिथी संस्थेची संचालक भगवान लाडवंजारी, संतोष चाटे व ईश्वर पाटील, प्राथमिक विद्यालयाच्या च्या मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात थोर संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी व प्रमुख अतिथी यांनी केले. यावेळी थोर संत भगवान बाबा यांच्या कार्याची माहिती अतुल चाटे यांनी सांगितली. यावेळी कार्यक्रमाला प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सूर्यवंशी, गणेश आंधळे, मोतीलाल पाटील, यांनी सहकार्य व परिश्रम घेतले. थोर संत भगवान बाबा यांना यावेळी प्रमुख मान्यवरांनी व उपस्थित मुख्याध्यापीका ,शिक्षक कर्मचारी यांनी वंदन केले.