जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची महत्वाची बैठक चोपडा तालुक्यात धानोरा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी शेती सोबत जोडव्यवसाय कडे लक्ष द्यावे जेणेकरून नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेस उद्भवल्यास या जोडव्यवसायातुन मिळण्याऱ्या मोबदल्यात आपल्या परिवाराच्या आर्थिक गरजा पुर्ण होऊ शकतात असे आवाहन केले.
शेतकऱ्यांना उदभवण्याऱ्या समस्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध रहावे असे आवाहन केले. शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. लवकरच जळगाव जिल्ह्यात पक्षाचे अधिकृत कार्यालय सुरू करण्यात येईल आणि या कार्यालयात शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळेल, त्या सोबत पाठपुरावा करून त्या मिळवून देण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी सज्ज झाले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघातील अमोल पाटील जिल्हा सचिव रावेर लोकसभा,दिपक पाटील जिल्हा संघटक रावेर लोकसभा, वसीम तडवी उपजिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा, चोपडा तालुका अध्यक्ष शुभम पाटील ,चोपडा तालुका उपाध्यक्ष रहिम शेख, चोपडा तालुका संघटक गणेश गुजर, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष विनोद पाटील आदींच्या नियुक्त्या राज्य सचिव अमोल भिसे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हा संघटक जनहित कक्ष राजेंद्र निकम, विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, संदिप मांडोळे, श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, प्रदिप पाटील, विलास सोनार, बापू महाजन, मनोज लोहार, हर्षल वाणी, चैतन्य पाटील, विरेंद्र बोरसे, रोहित महाजन आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.